Ad will apear here
Next
‘भैरव भवतारक’ नृत्याविष्काराद्वारे नवरसांची अनुभूती


पुणे :
भक्ती, शक्ती, करुणा, शृंगार, क्रोध अशा विविध भावनांचा मिलाफ असलेल्या ‘भैरव भवतारक’ या अनोख्या नृत्याविष्काराने पुणेकर रसिकांना नवरसांची अनुभूती दिली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘ऋत्विक फाऊंडेशन’ व ‘ऋजुता सोमण कल्चरल अकॅडमी’च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 



प्रसिद्ध कथक नृत्यांगना व ऋजुता सोमण कल्चरल अकॅडमीच्या संस्थापिका ऋजुता सोमण यांच्या संकल्पनेतून हा नृत्याविष्कार साकार झाला. नृत्य व संगीत कलेची आद्य देवता असलेल्या नटराजाला अर्थात शंकराला वंदन करून नृत्याविष्कारातून प्रसन्न करण्याची मध्यवर्ती संकल्पना ठेवून हा कथक नृत्याविष्कार सादर करण्यात आला. यात शिवाचे विविध पैलू मांडणाऱ्या नृत्यरचना सादर झाल्या.



पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी गायलेल्या ‘भो शंभो शिव स्वयंभो...’ या शिवस्तुतीने सुरुवात करण्यात आली. संपूर्ण नृत्यदिग्दर्शन, त्यातील हस्तमुद्रा, भावमुद्रा, जोश आणि आकर्षक नृत्यरचना यांनी रसिकांना खिळवून ठेवले होते. शिव-शक्तीचे मीलन असणारे अर्धनारीनटेश्वराचे रूप साकारताना सादरीकरणातील नजाकत, पुरुषी रुबाब आणि स्त्रीसुलभ अदाकारी यांचा लीलया मेळ साधत हा नृत्याविष्कार पेश झाला.



आपले पिता राजा दक्ष यांनी आयोजित केलेल्या यज्ञ समारंभाला न बोलाविल्याने रागावलेल्या सतीने त्याच यज्ञात उडी घेतल्याची कथाही अत्यंत लक्षवेधी पद्धतीने सादर करण्यात आली. ‘दक्ष यज्ञ’ ही कविता पं. लच्छू महाराज यांनी लिहिलेली असून, याची नृत्यरचना पंडिता गुरु रोहिणी भाटे यांची होती. त्यानंतर ‘डिम डिम डम डमरू बाजे..’ या बंदिशीवर त्रिशुळाच्या आकारात साकारणाऱ्या मुद्रांनी रसिकांना वेगळी अनुभूती दिली.

नृत्याची देवता म्हणून शंकर, नटराजाला ओळखले जाते. या देवतेने केलेले नृत्य हे तांडवनृत्य म्हणून ओळखले जाते. नृत्याची खरी जादू या शिवतांडवनृत्यात अनुभवायला मिळते याची प्रचीती या वेळी रसिकांनी घेतली. यानंतर गंगावतरणाची कथा या नृत्याविष्कारातून साकारण्यात आली. 

यात ऋजुता सोमण यांच्याबरोबर सानिका देवधर, श्रेय करंदीकर, सानिका, जोशी, अनिला अरोरा, सागरिका पंडित, प्रीशा ठक्कर, सृष्टी शर्मा, ईश्वरी करपे, ईशानी अभ्यंकर, ईशा छत्रे, रेणुका तिकारे, फाल्गुनी कुलकर्णी यांनी नृत्याविष्कार सादर केले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZPRCJ
Similar Posts
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात ‘भैरव भवतारक’ नृत्याविष्कार पुणे : सादरीकरण कलांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ऋत्विक फाउंडेशन’ व ऋजुता सोमण कल्चरल अकॅडमीच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘भैरव भवतारक’ या अनोख्या नृत्याविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी, २२ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी सात वाजता कोथरूड येथील वेद भवनच्या मागे ‘ऋत्विक फाऊंडेशन’ येथे हा कार्यक्रम होणार आहे
पुणेकरांनी अनुभवली मांगल्याची ‘स्वर-प्रभात’ पुणे : नुकतीच सुरू झालेली थंडी... सभोवताली पसरलेली धुक्याची शाल... अन मंत्रमुग्ध करणारे सनईचे सूर...अशी मंगलमय सकाळ पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते पहाटेच्या रागांवर आधारित ‘स्वर प्रभात’ या कार्यक्रमाचे.
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते
६७वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव - चौथ्या दिवसाचे व्हिडिओ पुण्यात सध्या सुरू असलेल्या ६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात चौथ्या दिवशी (१४ डिसेंबर २०१९) किराणा घराण्याचे गायक ओंकारनाथ हवालदार यांनी कन्नड-मराठी अभंग सादर करून रसिकांची मने जिंकली. शाकिर खान (सतार), तेजस उपाध्ये (व्हायोलिन) यांचे सहवादन, स्वामी कृपाकरानंद, तसेच अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन, डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language